पनवेल: मुंबई गोवा महामार्गावर पनवेल बस स्थानकातून महाडला जाणारी एसटी बस आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, संपूर्ण बस जळाली केवळ बसचा सांगाडा उरला आहे. कर्नाळा येथे ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील प्रवाशांना कोणतीही इजा न झाल्याचे समजते. ( caught fire near ) पनवेल बसस्थानकातून निघालेली ही बस महाडला जात असताना कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या चढावाला लागल्यानंतर गाडीतून अचानक धूर निघत होता. ड्रायव्हरने गाडी थांबवत, प्रसंगावधान दाखवले आणि कंडक्टरने प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. त्यावेळी बसमध्ये २२ ते २३ प्रवासी होते. आज सकाळी साडे नऊच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. क्लिक करा आणि वाचा- बाहेर निघताना या बसमधील प्रवाशांपैकी एका महिला प्रवाशीची बॅग बसमध्येच राहिली. विशेष म्हणजे या बॅगेत तिचे १५ हजार रुपये असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आग भीषण असल्याने हे सर्व खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. यावेळी पनवेल फायर ब्रिगेड आणि सिडको फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग लागलेली बस विझवली. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. क्लिक करा आणि वाचा - क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BpgaIwu
No comments:
Post a Comment