पुणे : केकेआरच्या संघाला शनिवारी झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात लखनौने केकेआरचा तब्बल ७५ धावांनी पराभव केला. पण या पराभवानंतर केकेआरचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. केकेआरचे आव्हान संपले का, जाणून घ्या...केकेआरचे आता या आयपीएलमध्ये ११ सामने झाले आहेत. या ११ सामन्यांमध्ये केकेआरच्या संघाला फक्त चारच विजय मिळवता आले आहेत, तर त्यांना सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे केकेआरच्या संघाचे ११ सामन्यांनंतर आठच गुण झाले आहेत. आता केकेआरचे फक्त तीन सामने उरले आहेत. त्यामुळे या तिन्ही सामन्यांमध्ये जर केकेआरच्या संघाने विजय मिळवला, तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. आयपीएच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी १६ गुणांची गरज असते, असे म्हटले जाते. पण आता केकेआरचे १६ गुण होऊ शकत नाहीत, पण तरी देखील केकेआरचे आव्हान मात्र अजूनही अधिकृतपणे संपुष्टात आलेले नाही. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त दोन संघांचेच १६ गुण झाले आहेत आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शर्यत अजूनही संपलेली नाही. त्यामुळे केकेआरच्या प्ले ऑफच्या आशा जीवंत आहेत. पण त्यासाठी अन्य संघांचे कसे पराभव होतात आणि केकेआरचा कसा मोठा विजय होतो, यावर हे सारे गणित अवलंबून असेल. केकेआरला आता फक्त विजय मिळवून चालणार नाही, तर तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना मोठा विजय मिळवत रनरेट वाढवावा लागणार आहे, तरच त्यांचे आव्हान कायम राहू शकते. केकेआरचा कसा झाला पराभव, जाणून घ्या...लखनौच्या संघाने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत केकेआरपुढे १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. आंद्रे रसेलचा अपवाद वगळता एकाही फलंदजाला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना तब्बल ७५ धावांनी पराभव पत्करावा लागला. लखनौच्या संघाकडून अवेश खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत केकेआरचे कंबरडे मोडले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DKW8IE1
No comments:
Post a Comment