Breaking

Sunday, June 26, 2022

पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेती काजल सरगरचे केले कौतुक; भारावले कुटुंब https://ift.tt/03V6fyr

सांगली : 'खेलो इंडिया यूथ गेम्स' स्पर्धेत प्रकारात सुवर्णपदक पटकावलेल्या सांगलीच्या (Kajal Sargar) हिचे (PM Narendra Modi) यांनी कौतुक केले आहे.'मन की बात'कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काजल सरगरचा उल्लेख करत,काजलने ज्या परिस्थितीतून वेटलिफ्टिंग प्रशिक्षण घेऊन स्वर्णपदक पटकावला आहे, याबद्दल कौतुक करत,तिचा आदर्श इतर मुलींनी घ्यावा,असं मत व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या कौतुकाने काजल आणि सरगर कुटुंब भारावून गेले आहे. ( lauded gold medalist ) सांगली शहरातल्या शिंदेमळा या ठिकाणी चहा आणि भजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलीने नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात सुवर्णपदक पटकावला आहे. काजल महादेव सरगर असे या खेळाडू मुलीचे नाव आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून काजलने प्रशिक्षण पूर्ण केले. त्यातून खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये वेटलिफ्टिंग खेळात थेट सुवर्णपदक पटकावला आहे. क्लिक करा आणि वाचा- तिच्या या यशाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली आहे."मन की बात"कार्यक्रमादरम्यान जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काजलच्या यशाचे कौतुक केले आहे. सांगली सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या काजलने,आपल्या आई-वडिलांना चहा आणि भजी विक्री व्यवसायात मदत करत वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेऊन "खेलो इंडिया यूथ गेम्स"मध्ये सुवर्णपदक पटकावले, ही खूप अभिमानास्पद बाब असल्याचं नमूद करत कौतुक केले आहे. तसेच काजल प्रमाणे इतर मुलींनीही कामगिरी केली पाहिजे, असे मतही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. क्लिक करा आणि वाचा- तर, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकामुळे काजल आणि सरगर कुटुंब भारावून गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कौतुक खूप मोठी गोष्टी असून त्यामुळे आणखी प्रेरणा मिळाल्याची भावना काजल व सरगर कुटुंबाने व्यक्त केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hDISQvW

No comments:

Post a Comment