नवी दिल्ली: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अरब देशांमध्ये उमटू लागले आहेत. कतारमधील सरकारनं भारताचे राजनैतिक अधिकाऱ्यांकडे एक पत्र देत भारत सरकारनं या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. भारताचे राजनैतितक अधिकारी दीपक मित्तल यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट करत वैयक्तिक टिपण्णीला भारताची अधिकृत भूमिका मानू नये असं म्हटलं आहे. कतारच्यावतीनं दीपक मित्तल यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुपूर शर्मांच्या वक्तव्याबद्दल निषेध आणि नाराजी व्यक्त केली आहे. नुपूर शर्मांच्या निलंबनाचं स्वागत कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल मुरैखी यांनी दीपक मित्तल यांच्याकडे निवदेन सोपवलं. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना हटवण्यात आल्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. मात्र, त्यासोबत भारत सरकारनं या वक्तव्यांचा निषेधकरावा आणि माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांविरोधातील वक्तव्यांमुळं हिंसा वाढू शकते, असं ते म्हणाले. कतारनं जारी केलेल्या निवेदनात जगभरातील २ अब्ज मुस्लीम मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांवर चालतात. धार्मिक द्वेष पसरवणारी ही वक्तव्य जगभरातील मुस्लीम समुदायाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कतार सर्व धर्मांच्या, सर्व देशांच्या नागरिकांच्या प्रती सहिष्णुता, समान मूल्यांचा स्वीकार करते, असं म्हटलं गेलं आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबद्ल ओमानचे ग्रँड मुफ्ती यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते. कतार पाठोपाठ कुवेत आणि इराणनं देखील नाराजी व्यक्त केलीय. भारतीय राजदुतांचं प्रत्युत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयांचे राजदूत दीपक मित्तल यांनी कोणत्याही व्यक्तीकडून किंवा पक्षाच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांशी भारत सरकारचा संबंध नाही. भारत सरकार संविधानातील मूल्यांवर चालते. भारत एकतेमध्ये विश्वास ठेवते. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं देखील दीपक मित्तल यांनी कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं. दरम्यान, मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी एका टीव्ही डिबेटमध्ये नुपूर शर्मांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपनं त्यांचं सहा वर्षांसाठी सदस्यत्व निलंबित केलं आहे. तर, नवीनकुमार जिंदल यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. नवीनकुमार जिंदल यांनी पैंगबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं ते नंतर डिलीट केलं होतं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TASMkZ7
No comments:
Post a Comment