पिंपरी : () हे १४ जून रोजी देहू मंदिराच्या शिळा मंदिराचे () लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थांकडून मंदिर दर्शनासाठी उद्या( दिनांक १२) पासून मंगळवारी ( दिनांक १३) सायंकाळपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. temple will be closed for Darshan from tomorrow मोदी यांचे देहूत आगमन होणार असल्याने प्रशासन आणि भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे तयारीसाठी उद्यापसून मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- देहू संस्थांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून देहू संस्थान तशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यावर उद्याच अमंलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. क्लिक करा आणि वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच येत आहेत देहू नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच देहू नगरीत येत असल्याने देहूकरांसाठी हा आनंद वेगळा असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या आगमनाची देहूकर वाट पहात असल्याचे पहायला मिळत आहे. क्लिक करा आणि वाचा- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिर तयार होण्यास लागला चौदा वर्षांचा कालावधी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिर तयार होण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला आहे. तसेच त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने देहू संस्थानकडून विशेष तयारी केली जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून वारकरी, टाळकरी सर्वजण येणार असल्याचे विश्वस्थांकडून सांगण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HqCPjlW
No comments:
Post a Comment