Breaking

Wednesday, June 22, 2022

महाराष्ट्राचं सत्तानाट्य सुप्रीम कोर्टात, बंडखोरांवर ५ वर्षांची बंदी घाला, याचिकेद्वारे मागणी https://ift.tt/3NwiI7c

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील वातावरण ढवळून गेलं आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्य आता सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. महाराष्ट्रातील कोणताही नेता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन गेलेला नाही. मध्य प्रदेशातीत काँग्रेसच्या महिला नेत्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत मोठी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टानं जे आमदार राजीनामा देतील आणि निलंबित होतील, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवता येऊ नये, अशी मागणी जया ठाकूर यांनी केली आहे. आमदारांचं निलंबन आणि राजीनामा दिल्याच्या तारखेपासून त्याला पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावं, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. जया ठाकूर यांनी यापूर्वी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीप्रमाणं आमदारांना शिस्तभंगाच्या कारवाई द्वारे पद गमवावं लागलं. ज्या कालावधीसाठी त्यांना निवडून देण्यात आलं आहे. त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांना पुढील पाचवर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जया ठाकूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात जानेवारी २०२१ सुनावणी होतं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता जया ठाकूर यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्र सरकार, भारत निवडणूक आयोगानं माझ्या याचिकेवर त्यांची भूमिका मांडणारी प्रतिज्ञापत्र सादर केलं नसल्याचं म्हटलं. त्या संदर्भातील नोटीस ७ जानेवारी २०२१ ला निघाल्याचं जया ठाकूर म्हणाल्या. पक्ष बदलणे, राजीनामा देणे यासंदर्भातील कठोर नियम नसल्यानं राजकीय पक्ष जनतेनं निवडून दिलेलं सरकार पाडण्यासाठी त्याचा गैरवापर करत असल्याचं म्हटलं आहे. जया ठाकूर यांनी यासंदर्भात देशात आणि विविध राज्यात हे घडत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात असा प्रकार १८ जूनपासून सुरु झाला असून तो आजदेखील सुरु असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्ष लोकशाही संरचना नष्ट करत असल्याचा दावा त्या याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयानं या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज असल्याचं जया ठाकूर म्हणाल्या. जया ठाकूर यांनी त्यांच्य याचिकेत कर्नाटक, मणिपूर, मध्य प्रदेश या राज्यांचा संदर्भ देत लोकशाही आणि घटनाविरोधी कृत्य थांबली पाहिजेत अशी मागणी केली आहेत. राजीनामास्त्र, बंडखोरी यामुळं राज्याला स्थिरता मिळत नाही. जया ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाकडे राजीनामा देणाऱ्या किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊन सदस्यत्व जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभं राहण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6JnHbFh

No comments:

Post a Comment