मुंबई : महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममध्ये मुक्कामी असून तिथून ते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यांनी ट्विटवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काय म्हणाले अशोक पंडित सिनेमा निर्माता-दिग्दर्शक अशोक पंडित हे कायम देशातील सामाजिक राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. अनेकदा त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल ही केले जाते. परंतु त्यांतरही पंडित त्यांची मते सोशल मीडियावर मांडत असतात. आता देखील महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर त्यांनी भाष्य केलं आहे. पंडित यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते तर पालघर इथं झालेल्या साधूंच्या मारेकऱ्यांना फाशी झाली असती. संपूर्ण राज्यात हनुमान चालिसा वाजवण्यात आली असती. इतकंच नाही तर महाराष्ट्रावर सोनिया गांधी आणि शरद पवारा यांचं राज्य नसतं.' अशोक पंडित यांनी केलेल्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्य आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, 'झालेल्या जखमांना तुम्ही पुन्हा खरवडून काढू नका...' तर आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, 'तुम्हाला असं वाटतं का सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळाला आहे.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mK2Mwu1
No comments:
Post a Comment