डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार () हे नॉट रीचेबल असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी ट्विट करुन भूमिका मांडली आहे. मनसे प्रमुख यांचा आदेश प्रमाण आहे, असं राजू पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन त्यांना आपल्या सोबत राहण्यासाठी विनंती करत आहेत. सहा जागांसाठी सात उमदेवार रिंगणात असल्यानं एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय आता निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत. राज ठाकरे निर्णय घेणार मनसे आमदार राजू पाटील यांनी "चिंता नसावी, आमच्यासाठी मा. श्री.राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही", असं म्हणत मनसे कुणाला पाठिंबा देणार हे राज ठाकरे ठरवतील असं म्हटलंय. त्यामुळं मनसे राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार हे १० जून रोजी स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरु राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून अपक्षांच्या मनधारणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मविआ आणि भाजप अपक्षांनी आपल्याला मदत करावी म्हणून प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्यानं निवडणूक लागली आहे. भाजपनं राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले आहेत त्यामध्ये पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. तर, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्यापैकी सहा उमदेवार खासदार होतील, तर एका उमेदवाराचा पराभव होईल. राज्यसभा निवडणुकीचा निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर ठरणार आहे. एक एक मत महत्त्वाचं महाविकास आघाडी आणि भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रस्ताव देखील दोन्ही बाजूंनी फेटाळले गेले आहेत. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालंय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JKYohvm
No comments:
Post a Comment