मुंबई: शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेला व पर्यायानं महाविकास आघाडीला खिंडार पडल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं हे सत्तानाट्य आता संपलं आहे. या सत्तानाट्याचा शेवट मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्यानं झाला. राज्यातील जनतेशी संवाद साधून उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाचा; तसंच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. सामान्य नागरिकांनी देखील त्याचं मत मांडलं. अनेक भावुक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या. अभिनेता यानं देखील एक ट्वीट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हटलंय हेमंतनं? थॅंक्यू उद्धव ठाकरे...तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. करोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! काही दिवसांपूर्वी देखील हेमंतनं सत्तानाट्यावर केलेलं मार्मिक ट्वीट चर्चेत होतं. हेमंत अनेकदा सामाजिक- राजकीय परिस्थितीवर कधी उपरोधात्मक तर कधी व्यंगात्मक तर कधी थेट शब्दांत मतं व्यक्त करत असतो. राज्यातील राजकीय अस्थिर अशा वातावरणावरही हेमंतनं अत्यंत मार्मिक शब्दांत ट्वीट केलं होतं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची! पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती. काय म्हणता?'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OKSQdx3
No comments:
Post a Comment