नवी दिल्ली : भारत आणि रशिया गेल्या अनेक दशकांपासून मित्रत्त्वाचे संबंध राहिले आहेत. अडचणीच्या काळात मित्रचं उपयोगी पडतो, असं म्हटलं जातं. भारत आणि रशिया यांच्या बाबत हे वाक्य लागू पडतं. रशियानं यूक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई केल्यामुळं जगातील इतर देशांनी रशियावर आर्थिक बंधनं घातली आहेत. रशियाला एकट पाडण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्याचवेळी रशिया आणि भारत यांच्यातील मैत्री वाढत आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख शिखर बँका म्हणजेच भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रशियाची बँक ऑफ रशिया यांच्या पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. भारत आणि रशिया यांच्यामध्ये द्विपक्षीय पेंमेंट सिस्टीम संदर्भात बैठक होणार आहे. द्विपक्षीय पेमेंट सिस्टीमसंदर्भात सहमती झाल्यास दोन्ही देशांमधील व्यवहार करणं सोप होणार आहे. याबाबत मार्ग काढल्यास आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. रशियानं यूक्रेनवर २४ फेब्रुवारी रोजी लष्करी कारवाईला सुरुवात केली होती. त्यानंतर पाश्चिमात्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ रशियाचे अधिकारी पुढील आठवड्यात लोरो आणि नोस्ट्रो प्रकारचं खात उघडण्याबाबत चर्चा करणार आहेत. लोरो हे तृतीयपक्षी खातं असतं त्यामध्ये एक बँक त्यांच्या देशात दुसऱ्या बँकेसाठी खातं अघडते. तर, दुसऱ्या प्रकारात एखादी बँक दुसऱ्या देशाच्या बँकेत खात उघडते. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या बातमीनुसार दोन्ही देशांच्या शिखर बँकांचे प्रमुख भारत आणि रशिया यांच्या चलनात खातं उडण्याबाबत चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील मंत्रालयं, बँका, वित्तीय संस्था यांचे अधिकारी देखील यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आणि इंडसइंड बँकेचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहण्याच शक्यता आहे. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा मजबूत रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर बंदी घातली आहे. रशियानं भारताला सवलतीच्या दरात कच्चे तेल विकण्याचा प्रस्ताव दिला होता. अमेरिका आणि यूरोपियन यूनियनच्या दबावानंतर देखील भारतानं रशियाकडून कच्चा तेलाची आयात सुरु ठेवली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aEIzy2K
No comments:
Post a Comment