Breaking

Saturday, June 11, 2022

मुंब्र्यातील धक्कादायक प्रकार; मालमत्तेच्या वादातून जाळून घेण्याचा प्रयत्न https://ift.tt/JziDGVj

ठाणे : ठाण्यातील पोलीस ठाण्याच्या समोर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने आत्मदहन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जखमी झाल्यानंतर तरुणाला मुंबईच्या केइएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बाप आणि त्याच्या दोन मुलांमध्ये मालमत्तेच्या वाद सुरु होता आणि त्याच कारणावरून ही घटना घडली आहे. हे प्रकरण दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट असून देखील सुरु आहे. ( due to ) मुंब्र्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाप आणि मुलांमध्ये एका दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. मुंब्रा येथे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकान मालमत्तेवरून बाप अर्जुन चौरसिया आणि त्यांची दोन मुले मनोज चौरसिया आणि अशोक चौरसिया यांच्यात वाद सुरू आहे. सदरचा वाद हा सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून प्रकरण दिवाणी न्यायलयात पाठविले होते. सदरच्या प्रकरणी दिवाणी न्यायालयात प्रकरण सुरु आहे. क्लिक करा आणि वाचा- संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद प्रकरण न्यायालयात सुरू असताना अर्जुन चौरासिया यांनी या मालमत्तेचा व्यवहार केला. व्यवहार झाल्यानंतर अर्जुन यांनी दुकानाच्या कामाला सुरुवात केली. मात्र हा सर्व प्रकार त्यांच्या मुलांना आवडला नसल्याने त्यांनी या व्यवहाराला नकार दिला. मात्र अर्जुन यांनी आपली मनमानी केली असता त्यांचा छोटा मुलगा मनोज चौरसिया याने विरोध केला. मात्र वाद विकोपाला गेल्यानंतर मनोज चौरसिया याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला आग लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरारक प्रकार हा दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- मनोज चौरसिया याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानात पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. घटना घडताच अत्यवस्थ मनोज चौरासिया याला रुग्णवाहिकेच्या मदतीने मुंबईच्या केइएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर भाजलेल्या अवस्थेत मनोज याने रुग्णवाहिकेत बसून उपचारासाठी जाण्यास नकार दिला. मात्र जबरदस्तीने त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- शनिवारी संध्याकाळच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. असाच प्रयत्न करण्याचा प्रकार हा मनोजने केला होता. मात्र त्याला स्थानिकांनी आणि पोलिसांनी समजावले आणि प्रकरण हे न्यायलयात प्रविष्ट झाले. शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि ही दुर्दैवी घटना पोलिसांसमोरच घडली. या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पोलीस कशा प्रकारे कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zDukXEe

No comments:

Post a Comment