नागपूर : करून प्रियकराने चाकूने गळा चिरुन १५ वर्षीय केला. ही थरारक घटना मौद्यातील साळव्या येथील जंगलात बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अत्याचार, खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मारेकरी प्रियकराला अटक केली. धीरज सुरेश शेंडे (वय १९रा.भामेवाडा),असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे. (boyfriend has been arrested in connection with the rape and murder) मृत मुलगी ही दहाव्या वर्गात शिकत होती. सहा महिन्यांपूर्वी धीरजने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मंगळवारी सकाळी मुलगी शिकवणी वर्गाला गेली. याच दरम्यान धीरजने तिला गाठले. तो तिला घेऊन साळव्यातील जंगलात गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. ‘तुझे अन्य एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत’,असे म्हणून धीरजने तिच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. त्याने चाकूने मुलीच्या गळा चिरला. यात मुलीचा मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- या धक्कादायक कृत्यानंतर धीरज परत घरी आला. दरम्यान मुलगी घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. ती आढळून आली नाही. ती धीरजसोबत गेल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. नातेवाईकांनी मौदा पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, साहाय्यक निरीक्षक सतीश सोनेकर, उपनिरीक्षक अरविंद मोहोड, ठाकूर, यंगलवार, संजय यांनी शोध घेऊन धीरजला पकडले. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी धीरजकडे मुलीबाबत विचारणा केली. चौकशीत मुलीची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस त्याला घेऊन जंगलात गेले. मुलीचा मृतदेह आढळला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून धीरजला अटक केली. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी धीरजला गुरुवारी न्यायालयात हजार केले. न्यायालयाने त्याची दहा दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ysJp7oM
No comments:
Post a Comment