Breaking

Sunday, June 26, 2022

धक्कादायक! मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने मैत्रिणीचा गळा आवळून खून https://ift.tt/Nda8PDS

म. टा. प्रतिनिधी, मैत्रिणीच्या आईने केल्याने आलेल्या रागातून मित्राने मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना चाकण - नाणेकरवाडी येथे रविवारी ( २६ जून ) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मित्राला चाकण पोलिसांनी गजाआड केले आहे. (to avenge the the friend murdered his friend) प्रीतीकुमारी संतोष साह (वय १८, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव विष्णुकुमार विनोद साह (वय २०) असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली. क्लिक करा आणि वाचा- प्रीतीकुमारी ही चाकण एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होती. तर, आरोपी विष्णुकुमार हा सुद्धा एका कंपनीत कामाला आहे. प्रीतीकुमारी आणि विष्णुकुमार यांच्यात मैत्री होती. इतकेच नाही, तर प्रीतीकुमारीच्या आईची आणि विष्णुकुमारचीही ओळख होती. क्लिक करा आणि वाचा- प्रीतीकुमारीच्या आईने विष्णुकुमार याचा अपमान केला होता. याचा राग त्याला होता. याच रागातून विष्णुकुमारने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रीतीकुमारीचा गळा आवळून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा चाकण पोलिस तपास करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/u9B5DvS

No comments:

Post a Comment