मुंबई : शिवसेनेचे गुजरातहून आसामला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. स्पाईसजेच्या तीन विमानांनी त्यांना गुवाहाटीला नेले जाणार आहे. सध्या यांच्यासह सेनेचे बंडखोर आमदार शहरातील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र बंड फसू नये, यासाठी शिंदेंसह सर्व बंडखोर आसामला रवाना होणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, त्यांचे पीए असे एकूण ६५ जण असल्याची माहिती आहे. या सर्वांना तीन बसने विमानतळावर नेण्यात येईल. तिथे तीन विमानं सज्ज आहेत. या विमानांनी सर्व जण आसामला दाखल होतील. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ३५ हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. नुकतंच शिंदेंनी पळवून नेलेला आमदार हातावर तुरी देऊन त्यांच्या ताब्यातून निसटल्याचं समोर आलं. त्यामुळे अशाप्रकारे आणखी आमदार निसटून बंड फसू नये, यासाठी मुंबईपासून जवळपास २७०० किमी दूर आमदारांना नेण्याचा घाट शिंदेंनी घातला आहे. संजय राऊतांनी ठणकावलं दरम्यान, जे आमदार आज इथे नाहीयेत, त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्यांची राजकीय कारकीर्द संपेल, असा इशाराच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे () यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना सूरतला नेत बंड पुकारलं आहे. त्यानंतर शिंदेंसह सर्व आमदारांना परतण्याची ताकीद संजय राऊतांनी दिली. संजय राऊत काय म्हणाले? "आकडे कसले मोजताय? विधानसभेत वेळ येईल तेव्हा आकडे मोजा, पूर्ण बहुमत सिद्ध होईल. जे शिवसेना आमदार आज इथे नाहीयेत, त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्यांची राजकीय कारकीर्द संपेल" असा इशारा संजय राऊत यांनी दिला. "एकनाथ शिंदे आमचे सहकारी, मित्र सर्व काही आहेत. अजूनही आम्ही त्यांची वाट पाहतोय. आम्हाला खात्री आहे की एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांसह परत येतील. आमदारांना तिथून परत यायचं आहे, त्यांना येऊ दिलं जात नाहीये. काही आमदार हॉस्पिटलमध्ये आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. असा दबाव जर कोणावर आणला जात असेल, तर हे या देशासाठी गंभीर आहे. अमित शाहांनी यात लक्ष घालावं. देशाचे न्यायप्रिय गृहमंत्री आहोत हे दाखवून द्यावं" असंही संजय राऊत म्हणाले. हेही वाचा : "एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे का, असा प्रश्न संजय राऊतांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की भाजपसोबत सरकारमध्ये असताना त्यांच्याकडे कोणती खाती होती आणि आज महाविकास आघाडीत त्यांच्याकडे कोणती खाती आहेत, त्यांची किती प्रतिष्ठा वाढली आहे, हे पाहावं. शिंदे आणि सहकाऱ्यांनी प्रेमाने परत यावं, त्याचं स्वागत करु." अशी गळ संजय राऊतांनी घातली. "सुरतमध्ये त्यांच्या संरक्षणासाठी मुंबईतील काही गुंड बसले आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अशी वेळ आमच्या आमदारांवर यावी, हा त्यांच्या स्वाभिमानाला धक्काच आहे" असं म्हणत राऊतांनी भाजप नेत्यांवरच शरसंधान साधलं. हेही वाचा : गटनेते पदावरुन हकालपट्टी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थक गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नव्याने नियुक्ती झालेले अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/chwbBS0
No comments:
Post a Comment