Breaking

Sunday, June 19, 2022

सामना रद्द, मालिका बरोबरीत; पण तरीही रिषभ पंतने रचला विक्रम, असं नेमकं काय घडलं पाहा.... https://ift.tt/qY6UvMA

बंगळुरु : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे ही मालिका २-२ अशी बरोबर सुटली. पण पावसामुळे सामना रद्द झाला असला तरी एक विक्रम पंतच्या नावावर नक्कीच झाला आहे. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही कर्णधाराला असा विक्रम करता आलेला नाही. पंतच्या नावावर कोणता विक्रम झाला आहे, पाहा...हा सामना भारताने जिंकला असता तर संघाला ऐतिहासिक विजय मिळवता आला असता. पण हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि तरीही पंतच्या नावावर एक विक्रम झाला आहे. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामने जिंकण्याचा विक्रम आता पंतच्या नावावर कायम असेल. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ही तिसरी मालिका झाली आणि भारताला पहिल्यांदाच मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेत दोन सामने जिंकता आले आहेत. धोनी कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. ही मालिका २०१५ साली झाली होती आणि भारताला या मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघाने भारतात २०१९ साली दुसरी ट्वेन्टी-२० मालिका खेळली होती. यावेळी भारताचा कर्णधार हा विराट कोहली होता. यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. यावेळीही भारताला विजय मिळवता आला नव्हता. धोनीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत एकही ट्वेन्टी-२० सामान जिंकता आला नाही. कोहलीला मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना जिंकता आला होता. पण आता पंतना मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेत दोन सामने जिंकता आलेले आहे. आतापर्यंत कोणत्याही भारताच्या कर्णधाराला ही गोष्ट जमलेली नाही. त्यामुळे आता मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील सर्वाधिक विजयांचा निकाल आता पंतच्या नावावर असणार आहे, यात शंका नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wgiTYyF

No comments:

Post a Comment