मुंबई : मुख्यमत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या संवादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सत्ता नसली तरी तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं. आज उद्धव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्री म्हणून मी काय सुख भोगलंय, आनंद कधी भोगलाय असा सवाल केला. सेनेचे मंत्री म्हणून तुम्हाला जो मोकळेपणा शिवसेनेत मिळाला तो तुम्हाला तिकडे मिळेल का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तिकडे जाऊन मुख्मंत्री होणार असाल तरी खुशाल जा पण उपमुख्यमंत्री व्हायचंय असं सांगितलं असतं मी निर्णय घेतला असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री होणार असाल तर खुशाल जा बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ ला निधन झालं. त्यानंतर तुम्हाला जे मिळालं ते शिवसेनेमुळंच मिळालं. या बंडाच्या मागं मी आहे हे पसरवल जात होतं. भाजपनं उद्धवठाक जी मंत्रिपदं, मोकळेपणा शिवसेनेत मिळाला, मी तुमच्या खात्यात कधीच लुडबूड केली नाही. हे स्वातंत्र्य तुम्हाला भाजपमध्ये मिळत असेल, मुख्यमंत्री होणार असाल तर जरुर जा,असं उद्धव ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्रिच होणार असाल, तर सांगायचं होतं, केलं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी माझ्या शिवसैनिकांच्या पाठीत वार करणारी औलाद नाही. या बंडाला माझी फूस नाही, मी उघड निर्णय घेतला असता. महाविकास आघाडीत जाण्याचा जसा निर्णय घेतला तसा उघडपणे निर्णय घेतला असता. भाजपानं उद्धव ठाकरेंना एकट पाडायाचं बाकीच्यांना आपल्याकडे घ्यायचं, असं ठरवलं आहे. तुम्ही काय लालूच दाखवायचं असेल ते दाखवा, निवडून आलेल्यांना फोडाल पण निवडून देणारांना फोडू शकणार नाही,असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ही खासगी मालमत्ता नाही, एक विचार आहे. शिवसेना हे कुटुंब आहे, शिवसेना हा विचार आहे. भाजप शिवसेनेला संपवायला निघाला आहे. भाजपला हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको आहे. भाजपसोबत ज्यावेळी कोण युती करत नव्हतं आम्ही त्यांच्या सोबत युती केली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pzcg9Mo
No comments:
Post a Comment