Breaking

Wednesday, June 8, 2022

उरण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या मृत्युने खळबळ, तपास सीआयडीकडे https://ift.tt/stokRHE

उरण : जमिनीच्या वादातून अटक करण्यात आलेल्या आरोपीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास तब्येत बिघडल्याने आरोपीला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. आरोपीच्या मृत्यू प्रकरणावरून उरण पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई आहे. यासंदर्भातील अधिकचा तपास हा सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. नवी मुंबईचे डीसीपी आणि सीआयडीचे पथक उरण पोलीस ठाण्यात दाखल झाले. उरण पोलीसांनी अटक केलेल्या ४८ वर्षीय कैलास म्हात्रे याचा आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास हा सीआयडीकडे देण्यात आला आहे. उरण शहरालगत असलेल्या मुळेखंड येथील कैलास म्हात्रे आणि त्याच्या भावंडांना जमिनीच्या वादातून अटक करण्यात आली होती. ६ जूनला अटक केल्यानंतर त्यांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाण्यात आली होती. याचदरम्यान, मंगळवारी रात्रीच्या सुमारास आरोपी कैलासची प्रकृती बिघडल्याने त्याला उरण येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील वाशी येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आणि नंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. परंतु, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईचे डीसीपी यांनी उरण पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या घटनेचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XG387ga

No comments:

Post a Comment