मुंबई : महाराष्ट्रात करोना ससंर्गाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात आज करोना संसर्गाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, पुण्यात बीए.५ वेरिंयटचा ससंर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्रात सध्या ८४३२ सक्रिय करोना रुग्ण आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आज ८७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३९,८१६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०२% एवढे झाले आहे. महाराष्ट्रात आज १८८१ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,११,१२,९५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९६,११४ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत पुण्यात बी.ए. ५ वेरियंटचा नवा रुग्ण पुण्यात करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराच्या आणखी रुग्णाचे निदान झाले आहे. ३१ वर्षाच्या या महिलेला बी ए.५ या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नव्या विषाणू प्रकारचे पुण्यात रुग्णसंख्या आठपर्यंत पोहोचली आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी करोनाच्या बी ए.४ आणि बी ए.५ या दोन प्रकारच्या विषाणूंचे रुग्ण आढळले होते. पुण्यातील आयसर या प्रयोगशाळेत या रुग्णांच्या चाचण्यांची जिनोम सिक्वेसिंग करण्यात आले होते. त्या तपासणीमधून २८ मे रोजी पुण्यात नव्या विषाणू प्रकाराचा शिरकाव झाल्याचे अधोरेखित झाले होते. त्यावेळी नव्या विषाणूंचा सात जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. करोनाचा हा विषाणू प्रकार ओमायक्रॉन या वंशावळीचा आहे. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा आणखी एक रुग्ण आढळल्याची नोंद राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांच्या केलेल्या जिनोम सिक्वेसिंगच्या (जनुकीय क्रमनिर्धारण) अहवालात पुणे शहरातील एका ३१ वर्षीय महिलेत बी ए.५ हा विषाणूचा प्रकार आढळला आहे. ही महिला पूर्णपणे लक्षणेविरहित होती. तसेच ती घरगुती विलगीकरणात बरी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईनं चिंता वाढवली महाराष्ट्राची राजधानी मुंबईत करोना संसर्गाच्या रुग्णांच्या आकडेवारीनं एक हजारचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबईत गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत १२४२ नवे रुग्ण आढळले असून ५०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत ४ जून रोजी ८८९ करोना रुग्ण आढळले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NhL5aOS
No comments:
Post a Comment