Breaking

Tuesday, June 7, 2022

राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद https://ift.tt/VAXGW7r

अमरावती : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अमरावती ते अकोला महामार्गावरच्या लोणी ते मूर्तिजापूरपर्यंतच्या महामार्ग निर्मितीच्या कामाची ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये (Guinness book of world records) नोंद झाली आहे. हा विश्वविक्रम राजपथ इन्फ्रोकॉन कंपनीच्या नावावर नोंदविला गेला आहे. नियोजनानुसार मंगळवारी रात्री ९.२० वाजता ८० किलोमीटरचे दुपदरी काम पूर्ण झाले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम व सहकार्‍यांनी एकच जल्लोष करून विश्वविक्रमाचा आनंद साजरा केला. वंदेमातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. (construction of the has been recorded in the ) अमरावती जवळच्या लोणी येथून शुक्रवार ३ जूनच्या सकाळी ७.२७ वाजता कामाला सुरुवात झाली होती. ७ जूनपर्यंत सलग २४ तास म्हणजे एकूण १०८ तास हे काम सुरू होते. सदर कामाचे कंत्राट असलेल्या राजपथ इन्फ्रोकॉन कंपनीने तशी योजनाच आखली होती आणि त्यानुसार सलग पाच दिवस काम सुरू होते. सोमवार ६ जून सदर महामार्गावरच्या बिटूमीनस काँक्रीटिकरणाचा चौथा दिवस होता. याच दिवशी दुपारी राजपथने कतार येथे यापूर्वी झालेला २५ किलोमिटर रस्ता निर्मितीचा विश्वविक्रम मोडीत काढत नव्या विश्वविक्रमाकडे वाटचाल सुरू केली होती. पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. यापूर्वी राजपथने सांगली- सातारा दरम्यानच्या पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान सतत २४ तास रस्ता तयार करण्याचे काम करून विक्रम स्थापित केला होता. हे काम सुरू असतना अनेक मान्यवर मंडळींनी भेटी देऊन रस्त्याची पाहणी करत राजपथाला शुभेच्छा देत कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविले होते. क्लिक करा आणि वाचा- विक्रमासाठी अभूतपूर्व तयारी विश्वविक्रमासाठी राजपथच्या चमूने सूक्ष्म नियोजन केले होते. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचार्‍यांच्या चमू तैनात होत्या. कामाच्या स्थळी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती. ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत होते. क्लिक करा आणि वाचा- उच्चदर्जाच्या साधनसुविधा विदर्भातील ४५ अंश तापमानात हा विक्रम करण्यासाठी राजपथच्या चमूने सांघिक प्रयत्न केले. अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी अकोला - अमरावती मार्गावर माना येथे सुसज्ज कॅम्प उभारण्यात आला होता. येथे प्रशासकीय आणि अभियांत्रिकी कक्ष, चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार भोजन व्यवस्था, वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप, वानानुकूलीत कक्ष इत्यादी व्यवस्था उभारण्यात आल्या होत्या. क्लिक करा आणि वाचा- विश्वविक्रम देशाला समर्पित : कदम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशासाठी वेगळे काहीतरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महामार्ग निर्मितीचा संकल्प सोडला. तेच ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवले. त्यानुसार अमरावती - अकोला या राष्ट्रीय महामार्गावरच्या लोणी ते मूर्तीजापूर दरम्यान विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. योग्य नियोजन, सामुहीक प्रयत्नाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात ही आव्हानात्मक कामगिरी आम्ही यशस्वीपणे पूर्ण केली. राजपथ इन्फ्राकॉन जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. हा विक्रम आम्ही देशाला समर्पित करीत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Le2bXh

No comments:

Post a Comment