Breaking

Saturday, June 25, 2022

ट्रेन आणि प्लेटफॉर्ममध्ये अडकले ज्येष्ठ नागरिक; रेल्वे पोलिसाची धाडसी कामगिरी https://ift.tt/xj6zGDt

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढत असताना एका व्यक्तीचा ट्रेनच्या दरवाज्यात पाय घसरून ती व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. ट्रेनचा वेग हळू हळू वाढत होता. तशी ती व्यक्ती आणखी खाली जाऊ लागली. ही गोष्ट जवळच असलेल्या रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी त्या व्यक्तीला पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याच्याकडे धावले. कसलाही विचार न करता त्यांनी त्या ट्रेनमध्ये अडकलेल्या व्यक्तिला वाचवले. (Railway police rescued a senior citizen trapped in a train and platform) शिवाजीनगर रेल्वे स्थानकात २२ जून रोजी ट्रेन क्र 11029 DN दुपारी १२.२७ वाजता निघाली होती. या दरम्यान हा प्रकार घडला आहे. दैवबालबट्टर म्हणून जीव वाचला असेच म्हणावे लागेल. (वय ६० वर्षे) असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून आपण पालखी सोहळ्यासाठी सांगली येथून आलो होतो. दर्शन घेऊन परत जात असताना हा प्रकार घडला, असे त्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- यावेळी ढोले यांनी सांगितले, गेल्या दोन रात्रीपासून त्याला नीट झोपही येत नव्हती. यामुळे शिवाजी नगर स्थानकात ट्रेनची वाट पाहत असताना त्यांना प्लॅटफॉर्मवरच झोप लागली. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघू लागली तेव्हा जाग आली. ट्रेन निघून जाण्याच्या भीतीने त्याने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे शिवाजी नगर ते मिरज सीट क्रमांक D/86 कन्फर्म तिकीट होते. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रवाशाला जीवदान मिळाल्याने उपनिरीक्षक रतन सिंग यांचे आभार व्यक्त करून त्यांनी आरपीएफ विभागाचे आभार मानले आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TiwnAtj

No comments:

Post a Comment