Breaking

Monday, June 27, 2022

'हिशोबात राहा, नाहीतर संपवून टाकू'; मनसे शहराध्यक्षांना धमकीचे पत्र https://ift.tt/ZNaxyrE

ठाणे : उल्हासनगरचे शहराध्यक्ष यांना आल्याने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे. हिशोबात राहा नाहीतर संपवून टाकू, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. या धमकीप्रकरणी बंडू देशमुख यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ( to city president of Ulhasnagar) मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेले बंडू देशमुख हे गेल्या ५ वर्षांपासून मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचा पुतण्या तन्मेष देशमुख हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा उल्हासनगर शहर सहसचिव म्हणून कार्यरत आहे. रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बंडू देशमुख हे त्यांच्या लालचक्की परिसरातील ऑफिसमधून घरी गेले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्यांचा पुतण्या तन्मेष हा ऑफिस बंद करण्यासाठी आला असता त्याला ऑफिसच्या आत एक पत्र पडलेलं दिसले. क्लिक करा आणि वाचा- तन्मेष याने हे पत्र उघडून पाहिले असता त्यावर "तू आणि तन्मेष हिशोबात राहा, नाहीतर दोघांना संपवून टाकू. जास्त मस्ती आली आहे तुम्हाला, खास करून त्या तन्मेषला.. समजावून ठेव त्याला!" असा मजकूर प्रिंट केलेला आढळला. त्यामुळं बंडू देशमुख यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. क्लिक करा आणि वाचा- बंडू देशमुख यांना यापूर्वी सुद्धा अशाचप्रकारचं एक धमकीच पत्र आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता पुन्हा एकदा पत्र आल्यानंतर देशमुख यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना याबाबतची माहिती दिली. राजू पाटील यांच्याच सल्ल्यानुसार बंडू देशमुख यांनी पोलीस तक्रार केली असून हे पत्र नेमकं कुणी ठेवलं? याबाबत अद्याप कुणावरही संशय व्यक्त करणं कठीण असल्याचे बंडू देशमुख यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्याचे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या मुलालाही अशाच पद्धतीने धमकीचं पत्र देण्यात आले होते. त्यामुळे आता पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून धमकी देणाऱ्याला शोधून काढणे गरजेचे बनले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nX6yxOL

No comments:

Post a Comment