औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न, शहर पहिल्यांदा सोयीसुविधांनी अद्ययावत करुन नंतर शहराचं नामांतर करण्याची भूमिका, रोजगार रस्ते पाणी वीज अशा भूमिका मांडून सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी औरंगाबादच्या सभेत भाष्य केलं. याचवेळी हिंदुत्व आणि काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपला तोंडसुख घेतलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या याच भाषणाची विरोधी पक्षनेते यांनी खिल्ली उडवली आहे. संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?, असे प्रश्न पुनश्च एकदा फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारले आहेत. संभाजीनगर कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं संभाजीनगर कधी करणार? असा प्रश्न सत्ता गेल्यानंतर काही लोक विचारत आहेत. पण माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन आहे. ते मी विसरलो नाही, विसरणार नाही. ते मी करणारच.... एक दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झालेला आहे. कॅबिनेटने मंजूरी दिलेली आहे. पण एक सुरुवात म्हणून मी इथल्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर विमानतळ करा, असं ठराव आम्ही केंद्राकडे दिला आहे. का नाही होत अजून?, असा सवाल त्यांनी भाजपला केला. तर संभाजीराजेही म्हणतील चल तुला रायगडावर नेऊन टकमक टोक दाखवतो...! शहराचं नाव बदललं आणि पाणी नाही दिलं, रस्ते खराब दिले, रोजी रोटी दिली नाही तर संभाजीराजेही म्हणतील चल तुला रायगडावर नेऊन टकमक टोक दाखवतो, अशी शाब्दिक कोटी मुख्यमंत्र्यांनी केली. "शहराचं केवळ नामांतर करणार नाही, तर संभाजीराजेंना आदर्श वाटेल अभिमान वाटेल, असं हे नगर करुन दाखवीन", असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपच्या जलआक्रोश मोर्चावर मुख्यमंत्र्यांचा निशाणा गेल्या काही दिवसांपूर्वी कुणी तरी जलआक्रोश मोर्चा काढला होता. तो मोर्चा सत्ता गेली म्हणून काढला होता. पाण्यासाठी नव्हता. गेल्या ५ वर्षात तुम्हीच आमच्यासोबत होता. मग त्यावेळी आठवलं नाही का, निवडणूक आली की काहीतरी खोटं बोलून मतं घ्यायची. खोटं बोलून मतं मिळवणं हे शिवसेनेचं हिंदुत्व नाही. भाजपने सत्ता असताना औरंगाबादकरांना पाणी का दिलं नाही? औरंगाबादकरांच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार होतीये, प्रसंगी मेट्रो आणू, आराखडा तयार करु, पण त्याचवेळी शहराचं विद्रूपीकरण होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s3gGnZB
No comments:
Post a Comment