Breaking

Saturday, June 4, 2022

आधी IPS, नंतर IAS झाला, साताऱ्याचा ओमकार पवार शेतीच्या कामात व्यस्त https://ift.tt/N7A0Kdg

: केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेद्वारे होणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्वत: च्या गावी खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामात व्यस्त आहे. युपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परिक्षेत १९४ वा क्रमांक मिळवून आय ए एस झालेला ओमकार पवार हा सध्या त्याच्या मूळगावी आहे. सातारा जिल्ह्यातील सनपाने हे त्याचं गाव आहे. ओमकार पवार ऑगस्ट महिन्यात सेवेत रुजू होणार आहेत. ३० एप्रिलला जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ओमकार पवार यांनी आय ए एस होण्यात यश मिळवलं आहे. ओमकार सध्या स्वत:च्या सनपाने गावात वडिलांना शेती करण्यासाठी मदत करतोय. सध्या शेतात मशागतीची कामं सुरु आहेत. ओमकार हा वडिलांना मदत करतोय स्वत: ट्रॅक्टर चालवुन शेतीसाठी खत वाहून नेण्याचं काम करताना त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घरातील मुख्य कामात सुद्धा ओमकारचा हातभार सर्वांनाच होत असल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलय ओमकार आयएएस झाला तरी सुद्धा हुरळून न जाता जमीनीवर राहुन सर्व कामं पार पाडतोय. ग्रामीण भागातून गावकडं शिक्षण घेवुन आय ए एस झालेल्या ओमकार पवार याला ग्रामीण भागाची नस माहिती आहे. शेतक-यांची प्रश्न अडचणी या सर्वाचा त्याने सामना केला आहे. यामुळे येणा-या त्याच्या करीअर मध्ये याचा त्याला खूप उपयोग होईल ओमकार पवार यासारखे अजून अधिकारी व्हावेत अशी इच्छा अगदी त्याच्या आज्जीने सुद्धा व्यक्त केली आहे. ओमकारनं आयएएस व्हावं, असं आम्ही त्याला तो आठवीला असताना सांगितलं होतं, असं ओमकारच्या वडिलांनी सांगितलं. शेतीसोबत फोटोच्या व्यवसाय करुन त्याला शिक्षणासाठी मदत केली. ओमकारच्या या वाटचालीत त्यानं आणि आम्ही देखील संघर्ष केला, असं त्याचे वडील म्हणाले. मुलगा आयएएस झाला याचा आनंद होतो, आम्ही जे कष्ट घेतलं त्याला यश आलंय, असं त्याच्या आईनं म्हटलं. परीक्षेच्या तयारीच्या काळात आम्ही त्याला कमी जाणवू दिली नाही, असं ओमकारची आई म्हणाली. दरम्यान, ओमकार पवार यापूर्वी देखील केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएसचं प्रशिक्षण घेत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iu26YQv

No comments:

Post a Comment