मुंबई : यांच्या मातोश्री यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज (१३ जुलै) दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या कालावधीत पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराला शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. (shiv sena secretary milind narvekars mother passed away due to old age) मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QMA62wD
No comments:
Post a Comment