Breaking

Tuesday, July 19, 2022

खरं वाटणार नाही, पण एकही सिक्स मारता दक्षिण आफ्रिकेने रचला ३३३ धावांचा डोंगर https://ift.tt/EMak2jC

चेस्टर ले स्ट्रीट : सध्याच्या घडीला षटकार नाही, असा सामना पाहायला मिळत नाही. साध्या गल्लीतल्या सामन्यांमध्येही सहज षटकार पाहायला मिळतो. पण इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मात्र सामन्यात एक अशी गोष्ट घडली की त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३३३ धावांचा डोंगर रचला. पण यामध्ये त्यांना एकही षटकार लगावता आला नाही. वाचा- यापूर्वी श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ३४५ धावा केल्या होत्या आणि त्यामध्ये एकही षटकार मारला गेला नव्हता. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यातही ३३३ धावा झाल्या होत्या, पण या डावात एककही षटकार नव्हता. या विक्रमाशी आता दक्षिण आफ्रिकेने बरोबरी केली आहे. वाचा- दक्षिण आफ्रिकेने यावेळी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेला कर्णधार क्विंटन डीकॉकच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला १९ धावा करता आल्या. पण त्यानंतर रॅसी व्हॅन डर डुसेनने इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रॅसीने यावेळी ११७ चेंडूंत १० चौकारांच्या जोरावर १३४ धावांची धडाकेबाज खेळी साकारता आली. रॅसीने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत शतक झळकावले खरे, पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. रॅसीला यावेळी जेनेमन मलान आणि एडन मार्करम यांनीही अर्धशतके झळकावत चांगली साथ दिली. मलानने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी केली, तर मार्करमने यावेळी ६१ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ७७ धावांची खेळी सााकारली. पण यावेळी मलान आणि मार्करम यांनाही एकही षटकार लगावता आला नाही. अखेरच्या षटकांमध्येही दक्षिण आफ्रिकेने दमदार फटकेबाजी केली, पण तरीही त्यांना एक षटकार लगावता आला नाही. पण एकही षटकार न लगावता दक्षिण आफ्रिकेने ३३३ धावांचा डोंगर उभारला आहे. पण हा सामान लक्षात राहील तो बेन स्टोक्ससाठी, कारण बेन स्टोक्सचा हा अखेरचा वनडे सामना असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/a6nSger

No comments:

Post a Comment