पुणे : पुण्यातील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हँडब्रेक न लावताच पार्क केलेला एका ट्रॅक्टरने सुसाट वेगाने येत उभी असलेल्या वाहनांना उडवत एका टपरीला धडक दिली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (in pune a rammed parked vehicles and hit a tapri) पुण्यातील बिबेवाडीतील अप्पर बसडेपो येथील उतारावर उभा करून चालक चहा पिण्यासाठी गेला होता. मात्र त्याने ट्रॅक्टर चा हँड ब्रेक लावला नव्हता ट्रॅक्टर उत्तरावर लावला होता म्हणून उतारावर ट्रॅक्टर पुढे जाऊ लागला. उतार असल्याने अचानकपणे ट्रॅक्टरचा वेग वाढला आणि त्याने रस्त्यावरच्या ऑटोरिक्षाला धडक दिली. तसेच रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या नऊ दुचाकींनाही उडवले. क्लिक करा आणि वाचा- यात एक महिला जखमी झाली आहे. वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कोणी व्यक्ती उभी नसल्याने मोठा अपघात टळला आहे असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे . या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- व्हिडिओतून दिसले थरारक दृश्य वेगाने येत असलेल्या ट्रॅक्टरने रस्त्यावरील ऑटोरिक्षाला उडवल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यातून दिसत आहे. या ट्रॅक्टरने वेग पकडल्यानंतर काही समजण्याच्या आतच रस्त्याच्या कडेला पार्क असेलेल्या ९ दुचाकींना धकड देत त्याने एका टपरीला जमीनदोस्त केले. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या ट्रॅक्टरमध्ये चालक नसल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FCsdwpE
No comments:
Post a Comment