Breaking

Friday, July 8, 2022

अपयशी विराट कोहलीला दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार की नाही, भारतीय संघापुढे तीन पर्याय https://ift.tt/IgEdY3Q

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा ट्वेन्टी-२० सामना आता शनिवारी रंगणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहलीचा भारताच्या संभाव्य संघात समावेश करण्यात आला आहे. पण कोहली हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोहलीला आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ११ जणांच्या संघात स्थान मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण कोहलीसाठी आता तीन पर्याय भारतीय संघासाठी खुले आहेत. पहिला पर्यायकोहली हा तिसऱ्या क्रमांकावर ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीला येतो. पण कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये आता दीपक हुडाकडे भारताचे तिसरे स्थान देण्यात आले आहे आणि तो धडाकेबाज फलंदाजी करत आहे. दीपकने दमदार फलंदाजी करताना एक शतकही झळकावले आहे. त्याचबरोबर सातत्याने तो चांगल्या धावा करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातही त्याने धमाकेदार फटकेबाजी केली होती. त्यामुळे जर कोहलीला संघ घ्यायचे असेल तर दीपकला कितव्या स्थानावर खेळवायचे, हा मोठा प्रश्न भारताच्या संघापुढे असेल. त्यामुळे फॉर्मात असेलल्या दीपकला तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. पण त्याचवेळी कोहलीला संघात स्थान द्यायचे की नाही, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. वाचा- दुसरा पर्यायभारतासाठी कोहलीच्या जागी दुसरा पर्याय आहे तो सूर्यकुमार यादवचा. कारण सूर्यकुमारने गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्यामधील गुणवत्ता दाखवून दिली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर खेळताना त्याने दमदार फलंदाजी केली आहे. सूर्यकुमारएवढी चांगली कामगिरी कोहलीला गेल्या काही दिवसांमध्ये करता आलेली नाही. त्यामुळे कोहलीच्या जागेसाठी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघापुढे दुसरा पर्याय असेल. वाचा- तिसरा पर्यायभारतीय संघात तिसऱ्या स्थानासाठी तिसरा पर्याय आहे तो श्रेयस अय्यरचा. कारण श्रेयस हा एक युवा फलंदाज आहे आणि त्याने तिसऱ्या स्थानावर खेळताना चांगली फलंदाजी केली आहे. भविष्याचा विचार केला तर श्रेयस हा एक चांगला पर्याय तिसऱ्या स्थानासाठी असू शकतो, असे म्हटले जात आहे. वाचा- कोहली हा सातत्याने अपयशी ठरत आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांमध्ये तर त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही त्याची कामगिरी चांगली झालेली नाही. त्याचबरोबर कोहलीसाठी आता तीन पर्याय भारतीय संघापुढे खुले आहेत. त्यामुळे कोहलीसाठी ही मालिका अखेरची संधी असेल, असे म्हटले जात आहे. कारण कोहलीने या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/x1HzWkE

No comments:

Post a Comment