Breaking

Tuesday, July 19, 2022

'ते' गेले होते मित्राच्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमाला; १२ वाजचा दुचाकीवरून निघाले आणि... https://ift.tt/mV27zje

जळगाव : मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असलेल्या दोघांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. यात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील रेमंड चौफुलीवर घडली होती. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील उर्फ आश्विन गोकुळे सोनवणे (वय- २२ वर्षे, राहणार- हरीओम नगर), असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश भावलाल कोळी हा गंभीर जखमी झालेला आहे. (a youth lost life and another seriously injured in a in jalgaon) याबाबत अधिक माहिती अशी की, निखील उर्फ आश्विन सोनवणे हा तरूण आसोदा रोडवरील हरीओम नगरात वास्तव्याला होता. ७ जुलै रोजी निखिल त्याचा मित्र गणेश भावलाल कोळी (राहणार- आसोदा रोड, जळगाव) हे मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रमासाठी कुसुंबा येथे दुचाकी (एमएच १९ डीजे ८८४१) ने रात्री गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर निखिल आणि गणेश हे दोघे दुचाकीने घरी येण्यासाठी रात्री १२ वाजता कुसुंबा येथून निघाले. क्लिक करा आणि वाचा- दुचाकीने येत असतांना रेमंड चौफुलीजवळून जात असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून येवून जोरदार धडक दिली. या अपघातात निखील सोनवणे हा ठार झाला. तर गणेश कोळी हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेच्या ११ दिवसानंतर निखीलचे नातेवाईक रतीलाल संतोष सोनवणे रा. हरीओम नगर, आसोदा रोड, जळगाव यांनी सोमवारी १८ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. क्लिक करा आणि वाचा- त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cPF6vZg

No comments:

Post a Comment