Breaking

Sunday, July 3, 2022

...यालाच म्हणतात जंटलमन्स गेम, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा इंग्लंडनेही केला सन्मान https://ift.tt/ogEeSXx

बर्मिंगहम : भारताचा डाव अडचणीत सापडला असताना रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सावरले. पंत आणि जडेजा यांनी शतकं साकारली व त्यामुळेच भारताला चारशे धावांचा पल्ला गाठता आला. या दोघांनीही भारताला सावरले असले आणि इंग्लंड प्रतिस्पर्धी असला तरी त्यांनी या दोघांचा सन्मान केला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताची ५ बाद ९८ अशी बिकट परिस्थिती झाली होती. त्यावेळी भारताचा डाव आता काही वेळातच आटोपणार, असे काही जणांना वाटत होते. पण त्याचवेळी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा भारताच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनीही यावेळी शतकं झळकावली. त्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने त्यांचा खास सन्मान केला आणि स्टेडियममधील विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये या दोघांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. स्टेडियममध्ये शिरताना एक मोठा फकल लावण्यात आला आहे. या फलकावर आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये अविस्मणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे नाव लिहिले जाते. या यादीत नाव असणे हा खेळाडूंसाठी मोठा सन्मान असतो आणि हे भाग्य आता जडेजा व पंत यांला लाभले आहे. जोडी जमली...पंत आणि जडेजाने मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम...पंत आणि जडेजा यांनी पहिल्या डावात संघाला सावरताना त्यांनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पंत आणि जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची दमदार भागीदारी रचली. पंत आणि जडेजा यांनी ही भाागीदारी रचताना ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण २०११ साली भारताच्या गौतम गंभीर आणि अभिनव मुकुंद या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी खेळताना ६३ धावाची सलामी दिली होती. त्यानंतर भारताच्या एकाही डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीला एवढी मोठी भागदीरी रचता आली नव्हती. पण त्यानंतर ११ वर्षांनी मात्र पंत आणि जडेजा यांनी हा विक्रण मोडला आहे आणि इंग्लंडमध्ये खेळताना डावखुऱ्या फलंदाजांच्या सर्वाधिक भागीदारीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aruc6IG

No comments:

Post a Comment