Breaking

Friday, July 1, 2022

रिषभ पंतने रचला इतिहास, १२० वर्षांत एकाही क्रिकेटपटूला जमली नाही ही मोठी गोष्ट https://ift.tt/oXEA8OU

बर्मिंगहम : कसोटी सामन्याच्या पहिला दिवशी हिरो ठरला तो भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत. कारण पंतने आज एक अनोखा इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले. गेल्या १२० वर्षांत जी गोष्ट कोणालाच जमली नाही ती पंतने यावेळी करून दाखवली आहे. पंतने कोणता मोठा पराक्रम केला आहे, जाणून घ्या...भारतीय संघ अडचणीत सापडला होता. भारताची ५ बाद ९८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी पंत हा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. कारण पंतने यावेळी फक्त भारताच्या डावाला आधार दिला नाही तर तुफानी शतक झळकावत एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. पंतने या सामन्यात फक्त ८९ चेंडूंमध्ये आपले वादळी शतक पूर्ण केले. पंतने या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याचबरोबर या मैदानातील एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या मैदानात १९०२ सालापासून क्रिकेटचे सामने होत आहेत. पण गेल्या १२० वर्षात जे कोणालाही जमलं नाही ते पंतने करून दाखवले आहे. या मैदानात आतापर्यंत एकाही खेळाडूला १०० चेंडूंमध्येही शतक झळकावणे जमले नव्हते. पण पंतने तर या मैदानात ८९ चेंडूंत शतक झळकावले आणि इतिहास रचला आहे. त्यामुळे या मैदानात आता सर्वात जलद शतकाचा विक्रम पंतच्या नावावर रचला गेला आहे. पंतने यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठताना पंतने यावेळी माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले आहे. पंतने यावेळी ५२ डावांमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत, पण याच दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी धोनीला ६० डाव खेळावे लागले होते. त्यामुळे आता पंतने धोनीचाही विक्रम मोडीत काढत, आपणच सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज असल्याची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे आता पंत या डावात अजून कोणते विक्रम मोडीत काढतो, याची उत्सुकता तमाम क्रिकेट जगताला लागलेली असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GX5mYhv

No comments:

Post a Comment