म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर मुसळधार कायम असल्याने कोल्हापूर जिल्हा महापुराच्या छायेत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून गुरूवारी नदीचे पाणी इशारा पातळी गाठण्याची चिन्हे असल्याने कोल्हापूरकरांची अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान, ५५ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ( is in the shadow of ) जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यात गेले आठ दिवस पावसाचा जोर कायम आहे. इतर तालुक्यात पावसाची संततधार नसली तरी अधून मधून जोरदार पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात तर पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. अजूनही धरणे भरलेली नाहीत. तरीही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बहुसंख्य नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. क्लिक करा आणि वाचा- राधानगरी धरणाचा अजून एकही दरवाजा उघडला नाही, तरीही भोगावती आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगेचे पाणी ३६ फुटावर गेले आहे. ३९ फुटाची इशारा पातळी गुरूवारी नदी पार करण्याची चिन्हे आहेत. यामुळे नदी काठावरील गावांत अस्वस्थता पसरली आहे. क्लिक करा आणि वाचा- पावसाचा जोर कायम असल्याने ५५ धरणे पाण्याखाली गेली आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावाकडे जाणारे रस्ते वाहतुकीला बंद झाले आहेत. या परिस्थितीनंतर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत पाच लाखांचे नुकसान झाले आहे. आठ दिवस सतत पाऊस पडत असल्याने सूर्यदर्शन नाही. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Wn9tsNx
No comments:
Post a Comment