सांगली : सत्ता गेल्याचं सूतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर असून शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो,अशी भावना जयंत पाटलांची आहे, अशी टीका भाजप आमदार यांनी केली आहे. वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत होते. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकोडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने वाळव्यात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यासाठी आयोजित समारंभाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत व सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री यांच्यावर सडकून टीका केली. पडळकर म्हणाले, जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायचा प्लॅन केला. माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. पोलिसांना सांगितले होते, याला यात अडकावा. माझ्या विरोधात हद्दपारीची नोटीस आहे. पण आम्ही घाबरलो नाही, रोज लढत राहिलो. पण 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला. त्यानंतर सेना आमदार सुरतला गेलेली बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा आजच्या तारखे पर्यंत त्यांचे सुतक गेले नाही, अशी परिस्थिती आहे. जयंत पाटील सत्ता असेल तर काम करू शकता, सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो, अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार पडळकर यांनी केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xPF2RKf
No comments:
Post a Comment