Breaking

Monday, July 18, 2022

चॉकलेटच्या बहाण्याने नेलं, ४ वर्षीय चिमुरडीसोबत नराधमानं जे केलं त्यानं उस्मानाबाद हादरलं https://ift.tt/UyiB7S3

उस्मानाबाद : जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या ४ वर्षीय मुलीला चाॅकलेटच्या बहाण्याने एका पडक्या वाडयात नेऊन १८ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना समजताच संपूर्ण उस्मानाबादमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकत असणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीला वर्गातुन चाॅकलेटच्या बहाण्याने १८ वर्षीय तरुणाने अंगणवाडीच्या बाहेर आणले आणि चाॅकलेट देऊन एका पडक्या वाडयात नेऊन या तरुणाने अत्याचार केला. सदरील घडलेला प्रकार पिडित मुलीने घरी आल्यानंतर आईला सांगितला आणि ही घटना जिथे घडली तो पडका वाडा दाखवला. अत्याचाराची घटना कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे आणि उपनिरिक्षक अनुसया माने यांनी घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन सर्व पाहणी केली. त्यानंतर पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन १८ वर्षीय तरुणाच्या विरोधात लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vUIN2Tm

No comments:

Post a Comment