Breaking

Wednesday, July 6, 2022

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी... https://ift.tt/uzOB4b8

लंडन : इंग्लंडविरुद्धचा भारताचा पहिला ट्वेन्टी २० सामना हा गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार बदलणार आहे, त्यामुळे या सामन्यात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यासाठी भारतीय संघात आता मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. इशान किशन की संजू सॅमसनआयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी भारताची सलामीची धुरा वाहिली होती. पण आता रोहित शर्मा संघात परतणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. त्यामुळे कदाचित संजूला या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते आणि इशान व रोहित हे सलामीला येऊ शकतात. मधली फळीभारताची या सामन्यातील मधली फळी ही जवळपास निश्चित समजली जात आहे. भारताच्या मधल्या फळीमध्ये गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या दीपक हुडाला संधी निश्चितच दिली जाणार आहे. हुडाबरोबर सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांचेही स्थान पक्के समजले जात आहे. अष्टपैलू भारतासाठी अष्टपैलू खेळाडूंमध्येही विविधता पाहायला मिळत आहे. अक्षर पटेल हा दमदार गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी करू शकतो. गेल्या काही सामन्यांपासून त्याला संघात स्थान देण्यात येत आहे. पण त्याला पर्याय म्हणून वेंकटेश अय्यर हादेखील संघात आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी दिली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरेल. इंग्लंडविरुद्ध हा पहिलाच सामना असल्यामुळे भारतीय संघ यावेळी जास्त प्रयोग करणार नाही. त्यामुळे या सामन्यात वेंकटेशपेक्षा अक्षरला झुकते माप दिले जाऊ शकते. फिरकीपटूंमध्ये चुरसभारतीय संघात फिरकीपटूंमध्येही चांगली चुरस पाहायला मिळत आहे. कारण भारतीय संघात रवी बिश्नोईसारखा मिस्ट्री स्पिनर आहे. त्याचबरोबर रवी हा रोहित शर्माचा आवडता गोलंदाज समजला जातो. कारण त्याची गोलंदाजी फलंदजांना सहसा समजत नाही, असे रोहितचे म्हणणे आहे. रवीबरोबरच या संघात युजवेंद्र चहलसारखा अनुभवी फिरकीपटूही आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणत्या एका फिरकीपटूला संघात स्थान द्यायचे, याचा निर्णय भारताच्या संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. वेगवान गोलंदाजांमध्येही स्पर्धाभारताच्या वेगवान गोलंदाजांमध्येही यावेळी चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे. गेल्या सामन्यात उमरान मलिक, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार या तिघांना स्थान देण्यात आले होते. गेल्या सामन्यात हर्षेल पटेल हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे या पहिल्या सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाईल, असे दिसत आहे. हर्षलच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघात संधी मिळू शकते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5i8lZJa

No comments:

Post a Comment