Breaking

Tuesday, July 5, 2022

'एलआयसी' वधारतोय; शेअर गेला ७०० रुपयांवर,'या' ब्रोकर्सकडून २० टक्के तेजीचा अंदाज https://ift.tt/xsaXohA

मुंबई : आयपीओ योजनेतून गुंतवणूकदारांची झोप उडणारा ''चा शेअर आता हळुहळू सावरत आहेत. 'एलआयसी'च्या शेअरने आज मंगळवारी ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. 'एलआयसी'च्या शेअरबाबत एका ब्रोकर्स संस्थेने आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे. 'एलआयसी' आणखी २० टक्के वाढेल असे मोतीलाल ओसवाल या ब्रोकर्सने व्यक्त केलं आहे. 'एलआयसी'चा शेअर आज १.४९ टक्क्यांनी वधारुन तो ७०२.८० रुपयांवर बंद झाला. मागील पाच सत्रात एलआयसीचा शेअर ७ टक्क्यांनी वधारला आहे. यामुळे एलआयसीच्या शेअरबाबात आता वेगवेगळ्या ब्रोकर्स संस्था अंदाज व्यक्त करत आहेत. विमा बाजारात एलआयसीची मक्तेदारी आहे. त्यामुळे एलआयसीच्या शेअरबाबात ब्रोकर्स आशावादी आहेत. मोतीलाल ओसवाल ब्रोकर्सने एलआयसीचा शेअर आताच्या पातळीवरुन आणखी २० टक्के झेप घेईल, असा नवा अंदाज व्यक्त केला आहे. एलआयसीचा शेअर ८३० रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तो खरेदी करावा असा सल्ला मोतीलाल ओसवालकडून देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या वर्षात एलआयसीची वार्षिक १० टक्के दराने वृद्धी होईल. त्याशिवाय महामंडळाचे मार्जिन १३.६ टक्क्यांनी वाढेल, असे मोतीलाल ओसवालने अंदाज व्यक्त केला आहे. वैविध्य उत्पादने आणि उच्च नफा ही एलआयसी जमेची बाजू ठरेल, असे या अहवाला म्हटलं आहे. एलआयसीचा शेअर १७ मे २०२२ रोजी भांडवली बाजारात सूचीबद्ध झाला होता. एलआयसीचा शेअर ९४९ रुपयांचा भाव होता. मात्र शेअरने निराशाजनक सुरुवात केली. दोन महिन्यात एलआयसीचा शेअर ३४ टक्क्यांनी घसरला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8EJAr1k

No comments:

Post a Comment