Breaking

Monday, July 11, 2022

टिटवाळा-मुरबाड मार्गावर रेल्वे धावणार; राज्य सरकारने दिले आश्वासन https://ift.tt/yX3nGSZ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सोमवारी दिले. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. म्हणूनच रेल्वेमार्गाच्या खर्चात ५० टक्के वाटा उचलण्यासंदर्भात हमी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नियोजित मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा निधी मिळणार असल्यामुळे कामाला निश्चितच वेग येईल. मध्य रेल्वेकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कपिल पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी सन २०१९मध्ये पाटील यांनी केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Id5Grmc

No comments:

Post a Comment