Breaking

Friday, July 1, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हकालपट्टी https://ift.tt/zHGJ8gL

मुंबई: पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचं सरकार नको, भाजपसोबत चला अशी भूमिका घेत शिंदेंनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांनी साथ दिली. १० अपक्ष आमदारदेखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं ही वेळ आल्याचं ठाकरे राजीनामा देताना म्हणाले. एकनाथ शिंदेंनी काल भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आपल्यासोबत असल्यानं आम्हीच खरी असल्याचा दावा शिंदे गटानं केला. शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा सांगितल्यानं उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती असा प्रश्न शिंदेंच्या दाव्यानं निर्माण झाला. हा तांत्रिक पेच कायम असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेची घटना काय सांगते? शिवसेनेच्या घटनेत "शिवसेना प्रमुख" हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावानुसार ९ जण पक्षनेते आहेत. यापैकी सुधीर जोशी यांचं निधन झालं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख या अधिकारात चार जणांची पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती. या चार जणांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार यांच्याकडे आहेत. त्यामध्ये अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ठाकरेंनी केली आहे. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरेंनी शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1xJmWKR

No comments:

Post a Comment