Breaking

Friday, August 5, 2022

तानाजी सावंत आता कळालं का, कोण आदित्य ठाकरे? मुंबईच्या माजी महापौरांनी डिवचलं, जाणून घ्या कारण https://ift.tt/B79L4un

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडानंतर शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण आहे, तो एक साधा आमदार आहे, असं वक्तव्य केलं होतं.पुण्यातील शिवसैनिक त्यादिवशी संतप्त झाले होते. आता, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील तानाजी सावंत यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन डिवचलं आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत ७ पैकी ७ जागा मिळवल्याचा दाखला देत महाडेश्वर यांनी सावंत यांना डिवचलं आहे. विश्वनाथ महाडेश्वर काय म्हणाले? तानाजी सावंत आता कळालं का कोण आदित्य ठाकरे? तुमच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७ पैकी ७ ही जागा ज्यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत त्या पक्षाचे नेते हेच ते आदित्य ठाकरे आहेत, असा टोला महाडेश्वर यांनी लगावला आहे. दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेला यश दक्षिण सोलापूरमधील चिंचपूर येथील ग्रामपंचायतवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून भाजपाचा धुव्वा उडविला आहे.७ पैकी ७ जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत ,या निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमर पाटील गटाचा विजय झाला आहे. जय हनुमान विकास पॅनल या गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीत विजय नोंदविला आहे.यामध्ये संगव्वा बगले,सचिन चडचन,संगव्वा हत्तरसंग,सविता साबळे,गुरव्वा बनसोडे,गौराबाई हत्तरसंग,शंकर साबळे हे सात उमेदवार विजयी झाले आहेत. तानाजी सावंत काय म्हणाले होते? शिवसंवाद यात्रेच्या संदर्भानं बोलताना आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते. सावंत यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fLFRyJM

No comments:

Post a Comment