मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सरकार ३० जूनला स्थापन झालं होतं. एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा लांबलेला उद्या होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणारा दावा शिवसेना खासदारानं केला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे फडणवीसांचं मंत्रिमंडळ औट घटकेचं आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे गटातील अस्वस्थ असलेले १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले. विनायक राऊत काय म्हणाले मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही ते म्हणजेच अब्दुल सत्तार आणि इतर आमदार एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात करतील. त्यामुळं शिंदे फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे औटघटकेचं मंत्रिमंडळ ठरेल, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे गटातील १२ आमदार अस्वस्थ आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. अब्दुल सत्तारांची चौकशी व्हावी, अरविंद सावंतांची मागणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी, असं पत्र उपसभापतींना दिल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा केल्यानंतर आम्ही हे पत्र दिलं आहे. आमच्याकडे संख्याबळ आहे, आमच्यामध्ये समन्वय असून आम्ही पत्र दिल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं. बेकायदेशीर सरकारचं बेकायदेशीर मंत्रिमंडळ असल्याचं अरविंद सावंत म्हणाले. एका बाजूला महापूर, शेतकरी अडचणीत आहे, पण त्यांना दिलासा दिला जात नाही. अब्दुल सत्तारांच्या मुलीचं नाव टीईटी प्रकरणात आलं, सत्तारांनी सारवासारव केली पण त्यांची चौकशी व्हावी, असं अरविंद सावंत म्हणाले. मंत्रिमंडळात कुणाला स्थान? भाजपकडून उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात ९ ते १२ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे,अतुल सावे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा या नऊ जणांना मुंबईतून फोन गेला आहे. त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तर, एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले यांचं नाव चर्चेत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38anUHK
No comments:
Post a Comment