: व्हॉटस्ॲपचे बनावट चॅटिंग () तयार करुन व महिलेचा फोटो वापरुन त्याचे स्क्रीन शॉट तिच्या होणार्या पतीला पाठवून डॉक्टर तरुणीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पाचोरा तालुक्यातील ही डॉक्टर तरुणी असून या प्रकारामुळे तिची बदनामी करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. (A case has been registered in the case of fake WhatsApp chatting) याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विवाह ठरला आहे. ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान एकाने डॉक्टर तरुणीचा फोटो वापरुन त्या वापरत असलेला मोबाईल क्रमांकाचे व्हॉटसॲपचे बनावट चॅटींग तयार केले. तसेच त्याचे स्क्रीन शॉट तयार करुन ते त्या महिला डॉक्टरच्या अकाऊंटवरुन () त्यांच्या होणार्या नवऱ्याला पाठविले. क्लिक करा आणि वाचा- याप्रकारामुळे डॉक्टर तरुणीची मोठी बदनामी झाली. हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर तरुणीला मोठा धक्का बसला. यांनंतर या डॉक्टर तरुणीने सोमवारी सायबर पोलिसात धाव घेत बदनामी करणाऱ्या इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध तक्रार दिली. क्लिक करा आणि वाचा- डॉक्टर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार बदनामी करणाऱ्या इन्स्टाग्राम खातेधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पुढील पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BYufcL8
No comments:
Post a Comment