म. टा. प्रतिनिधी, : राज्यात नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाले असले तरी अजून पालकमंत्री पदाची जबाबदारी कुणालाच न दिल्याने जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहण कुठे आणि कुणाच्या हस्ते होणार हे निश्चित झाले. ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण तेच पालकमंत्री अशी दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर यांच्या हस्ते पुणे ऐवजी आता कोल्हापूरात होणार आहे. गुरुवारी घेतलेला निर्णय शुक्रवारी बदलल्याने आता कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वीस जणांचे मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले आहे. मंत्र्यांचा शपथविधी होवून चार दिवस उलटले तरी अजूनही खातेवाटप झालेले नाही. खातेवाटपाचा पत्ता नसल्याने पालकमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली नाही. येत्या १५ ऑगस्टपूर्वी ही जबाबदारी मिळण्याची शक्यता नाही. दरवर्षी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यामुळे सरकारने गुरूवारी प्रत्येक मंत्र्यांवर एकेक जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी काही मंत्री आणि अधिकाऱ्यांवर सोपविली. याबाबत मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव भुषण गगराणी यांच्या सहीने मुख्यमंत्र्यांचे आदेशही काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या आदेशानुसार एकोणीस मंत्री एकेक जिल्हा यानुसार एकोणवीस मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, चंद्रकांत पाटील पुणे, सुरेश खाडे सांगली तर शंभूराज देसाई हे सातारा येथे ध्वजारोहण करतील असे सुचित करण्यात आले होते. कोल्हापूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजून निश्चित झाली नसली तरी ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण तेच पालकमंत्री असतील अशी दाट शक्यता आहे. यामध्ये फार मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण अचानक पुण्यात ते ध्वजारोहण करतील असे सुचित करण्यात आले. यामुळे कोल्हापूरला कोण असा प्रश्न उपस्थित होवू लागला. पण एका रात्रीत हा निर्णय बदलला असून नव्या निर्णयानुसार आता पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरातील ध्वजारोहण होणार आहे. तसी पत्रिकाच जिल्हा प्रशासनाने दुपारी छापून घेतल्या आणि त्या प्रसारितही करण्यात येत आहेत. दरम्यान, पुण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री होणार की पुण्याचे याची आता उत्सुकता आहे. नवीन मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी पाटील यांच्याकडेच राहण्याची चिन्हे आहेत. खाडे यांच्याकडे सांगली तर देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची चिन्हे आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7lJUAyO
No comments:
Post a Comment