Breaking

Tuesday, August 9, 2022

इकडे बंडखोर शिवसेना सोबत आली, तिकडे बिहारमध्ये घालवले; खडसेंचा भाजपला टोला https://ift.tt/WICQ3A9

जळगाव : राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Govt) मंत्रिमंडळ विस्तार होत असतानाच तिकडे बिहारमध्ये नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दलाने (संयुक्त) भाजपची साथ सोडत राजकीय भूकंप घडवला. आता नीतीश कुमार लालूप्रसाद यादव () यांच्या राष्ट्रीय जनता दल () आणि काँग्रेसच्या () साथीने बिहारमध्ये सत्ता स्थापन करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. (after in bihar criticized the bjp) महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासोबत बंडखोर शिवसेना आणि तिकडे बिहारमध्ये मात्र भाजपने आपले सरकार घालवले, असा टोला एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस केंद्रामध्ये आली त्यावेळेस त्यांच्यासोबत अनेक मित्र त्यांच्यासोबत होते. मात्र आता सर्व त्यांना सोडून जात आहेत. भुसावळ शहरातील एका कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. खडसे म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आज राजीनामा देऊन लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत आघाडी केली. ज्यावेळी भारतीय जनता पक्ष केंद्रस्थानी आला, त्यावेळेस त्यांच्या सोबत अनेक मित्र होते. राज्यांमध्ये सरकार स्थापन करत असताना त्यांच्यासोबत त्या-त्या राज्यातील मित्र होते. काश्मीरमध्ये सरकार स्थापन करत असताना त्यांच्या सोबत तेथील मित्र होते. पंजाबमध्ये देखील त्यांच्यासोबत अकाली दल होता. त्याचप्रमाणे त्यांची महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती होती. एक काळ असा होता की अटलबिहारी वाजपेयी असताना भारतीय जनता पक्षासोबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी देखील त्यांच्या सोबत होत्या. आसाममध्ये देखील त्यांच्याकडे मित्रपक्ष होते. दक्षिणेकडेही सरकारमध्ये त्यांचे मित्रपक्ष सहभागी होते. जेव्हा भारतीय जनता पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले, तेव्हा अनेक सदस्य सहभागी झालेले होते. पण पुढे मात्र हळूहळू सर्वच्या सर्व त्यातून बाहेर पडले आणि नीतीश कुमार हे एकमेव मित्र राहिलेले होते. त्यांनी देखील आज यांची साथ सोडून दिलेली आहे, असे खडसे पुढे म्हणाल विशेष म्हणजे नीतीश कुमार यांनी आक्षेप घेतलेला आहे. आमच्या कामकाजात सातत्याने हस्तक्षेप करणे. मंत्री कोण असावेत यासंदर्भात देखील दबाव आणणे असे प्रकार भाजप करत असल्याचे नीतीश कुमार यांचे म्हणणे आहे. नीतीश कुमार यांनी जी कारणे दिलेली आहेत, तीच कारणे इतर पक्षांनीही त्यांची साथ सोडताना दिलेली आहेत. मला वाटतं की आता देशभरात नीतीश कुमार यांनी एक नवीन उदारहण पुन्हा अलिकडील कालखंडात दिलेले दिसत आहे, असे खडसे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत बंडखोर शिवसेना आली आणि बिहारमधील सरकार भाजपने घालवेल अशी आजची स्थिती आहे. याचा महाराष्ट्रात प्रभाव पडेल अशी आज स्थिती नाही. ही घटना महाराष्ट्रात घडलेली नाही. महाराष्ट्राच एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ते त्यांच्याबरोबर गेले. म्हणजे खरी सुरुवात ही महाराष्ट्रामधूनच झालेली आहे, असेही खडसे पुढे म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CUOKIYQ

No comments:

Post a Comment