Breaking

Saturday, August 13, 2022

तो बस थांब्यावर मोबाईल फोनवर बोलत उभा होता; अचानक असं काही घडलं की ते त्याचं शेवटचं बोलणं ठरलं https://ift.tt/y4hPcqH

अकोला : काल शनिवारी रात्री मोडकळीस आलेल्या बस थांब्याचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बस थांब्याच्या निवाऱ्याखाली फोनवर बोलत असलेल्या युवकावर हा स्लॅब कोसळल्याने युवक स्लॅब खाली पूर्णपणे दबला गेल्याने त्यांचा दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर इथे ही घटना घडली. विकी वसंत कोकरे (वय २२) असं स्लॅबखाली दबून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (A youth has died after a in Akola) मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर इथे बस थांब्यावरील प्रवासी निवारा शनिवारी अचानक रात्री साडेनऊ वाजता कोसळला. या दुर्घटनेत विकी कोकरे याचा जागीच मृत्यू झाला. विकी हा प्रवासी निवाऱ्याखाली फोनवर बोलत असताना अचानक प्रवासी निवाऱ्याचा , अन् तो स्लॅब खाली दबला. क्लिक करा आणि वाचा- या घटनेची माहिती मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देण्यात आली. त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले अन् स्लॅब फोडणे सुरु केले. अवघ्या २० मिनिटात स्लॅब खाली दबलेला युवकाला बाहेर काढले. तोपर्यत या दुर्घटनेत विकीचा मृत्यू झाला होता. यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम हे घटनास्थळी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- जिल्ह्यात अनेक प्रवासी निवारे कोसळण्याच्या अवस्थेत अकोला जिल्ह्यात आज मोडकळीस आलेला प्रवासी निवारा कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता मोडकळीस आलेल्या प्रवासी निवाऱ्यांची होणारी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अनेक मोडकळीस आलेले प्रवासी निवारे मृत्यूच्या दाढेत उभे आहेत. यापैकी एक म्हणजे बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव इथील प्रवासी निवारा गेल्या काही दिवसांपासून कोसळून खाली पडलेला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता तरी या घटनेनंतर संबंधित प्रशासनाला जाग येणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5e9iL8B

No comments:

Post a Comment