मुंबई : आणि यांच्यातील वादाचा नवा अकं आता पाहायला मिळणार आहे. समीर वानखेडे यांनी जात पडताळणी समितीकडून दिलासा मिळाल्यानंतर नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी समीर वानखेडे यांनी केली होती. त्याप्रमाणं नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांना जात वैधता तपासणी समितीनं क्लीन चीट दिल्यानंतर त्यांनी पुढचं पाऊल उचललं आहे. समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीनं ते मुस्लीम नसल्याचं म्हणत दिलासा दिला होता. समीर वानखेडेंनी यानंतर नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार समीर वानखेडेंच्या मागणीवरुन गोरेगाव पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. समीर वानखेडे यामध्ये तक्रारदार आहेत. पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून केला जाणार आहे. जात पडताळणी समितीकडे चार जणांनी वानखेडेंच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती.त्यामध्ये नवाब मलिक यांचा समावेश होता. आता गोरेगाव पोलीस नवाब मलिक यांच्या कोठडीची मागणी करणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. नवाब मलिक यांच्यावर कोणत्या कलमान्वये गुन्हा समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरुन नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०१ आणि अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत तपास करणार आहेत. दिलासा मिळताच नवाब मलिकांविरोधात तक्रार समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला होता. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता. समीर वानखेडे यांनी दिलासा मिळताच नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह चार जणांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना समीर वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, क्लीन चीट मिळताच वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात तक्रार केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s2wJ1rV
No comments:
Post a Comment