Breaking

Thursday, September 15, 2022

पुढच्या वर्षी मुंबईकरांना मिळू शकते स्वस्तात वीज; समोर आलं महत्त्वाचं कारण https://ift.tt/02XuNxv

म. टा. खास प्रतिनिधी : औष्णिक वीजनिर्मितीस लागणारा कोळसा झपाट्याने स्वस्त होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मुंबईसाठीच्या वीजनिर्मितीवर होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंत मुंबईकरांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्याची वीज मागणी १८ हजार मेगावॉट आहे. त्यात मुंबईची मागणी ३ हजार मेगावॉटच्या आसपास आहे. मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर व बेस्ट उपक्रमकडून वीजपुरवठा होतो. यापैकी ‘बेस्ट’ टाटा पॉवरकडून वीजखरेदी करते. टाटा पॉवर स्वत:च्या व ‘बेस्ट’च्या ग्राहकांना ट्रॉम्बे तसेच त्यांच्या तीन जलविद्युत प्रकल्पातून आणि काही नूतनीय ऊर्जा स्रोतांमधून वीजपुरवठा करते. ट्रॉम्बे येथील प्रकल्प मुंबईला विशेषत्वाने अखंड वीजपुरवठ्यासाठी कार्यरत असतो. तो ७५० मेगावॉट क्षमतेचा पूर्णपणे कोळसाआधारित (औष्णिक) वीज प्रकल्प आहे. याच प्रकल्पातील वीजनिर्मिती आता काहिशी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. टाटा पॉवरचा ट्रॉम्बे येथील प्रकल्प १०० टक्के आयात (प्रामुख्याने इंडोनेशिया) कोळशावर चालतो. एप्रिल-मेदरम्यान देशात कोळसा टंचाई होती. त्याकाळात आयात कोळशाच्या किमती जवळपास ७ हजार रुपये प्रति टनापर्यंत गेल्या होत्या. तर भारतीय कोळसा २८०० रुपये प्रति टन होता. आता भारतीय कोळसा १ हजार रुपये प्रति टनापर्यंत खाली आहे, तसेच आयात कोळसाही जवळपास ४ हजार रुपये प्रति टनावर आला आहे. यामुळे ट्रॉम्बे प्रकल्पातील वीजनिर्मिती काही प्रमाणात स्वस्त झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू येथील ५०० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्पही बहुतांश आयात कोळसावर चालतो. तेथील वीज मुंबईला पुरवली जाते. तेथील वीजनिर्मिती खर्चही कमी झाला आहे. ग्राहकांना शुल्क दिलासा नाहीच वीजनिर्मितीचा खर्च वाढला की वीज खरेदीचा खर्च वाढतो. हा खर्च वीज वितरण कंपन्या ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्काद्वारे वसूल करतात. मुंबईतील तिन्ही कंपन्या सध्या सरासरी ९० पैसे ते १.१५ रुपये प्रति युनिटनुसार हा खर्च वसूल करतात. मार्च ते मेदरम्यानच्या कोळसा टंचाईमुळे खर्च वाढल्याने ही वसुली केली जात आहे. आता वीजनिर्मिती व खरेदी दोन्ही स्वस्त झाले आहे. पण आधीचा खर्च भरून काढण्यासाठी किमान मार्च २०२३पर्यंत शुल्क कमी होणे किंवा शून्यावर येणे शक्य नाही, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0AqZpFs

No comments:

Post a Comment