मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा समर्थक आमदारांच्या आणि नेत्यांच्या बैठकीत घोषणा केली. शिंदे समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा, सोशल मीडियावरुन होणारी टीका, आमदारांची वक्तव्य, कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल निर्माण होणारे प्रश्न याबाबत आमदारांसह समर्थक नेत्यांना सूचना केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी कृती न करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं कळतंय. यंदाचा दसरा मेळावा जोरात साजरा करायचा आहे. ज्या काही परवानग्या आहेत त्या आपल्यालाच मिळतील. दसरा मेळावा आप शिवाजी पार्कवरच साजरा करु, असं एकनाथ शिंदेंनी म्हटल्याची माहिती आहे. सोशल मीडियावरुन आपल्याला डिवचण्याचं काम होतंय मात्र आपण त्याला कामानं उत्तर देण्याची गरज आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबईतील प्रभादेवीमध्ये झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी दादर पोलीस स्टेशनला ठिय्या मांडत सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही पुरावे देखील हाती लागल्याची माहिती आहे. त्यामुळं आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं वागू नये, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली आहे. शिंदे गटातील काही आमदारांच्या कृतीमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती अशा घटनांमुळं संपण्याची शक्यता देखील बोलून दाखवली जात होती. त्यामुळं अखेर एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीत आमदारांचे कान टोचले असल्याची माहिती आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळावा हा ५ ऑक्टोबरला होणार असल्याचं म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांनी मेळाव्याचं ठिकाण ठरलं नसल्याचं सांगितलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8FsD6hI
No comments:
Post a Comment