Breaking

Friday, September 9, 2022

शिंदे विरुद्ध ठाकरे; गणेश विसर्जन मिरवणुकीतच शिवसेनेतील दोन गट आमने-सामने आल्याने तणाव https://ift.tt/6P7sQvr

अहमदनगर : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेनेतील दोन गटांमध्ये वाद झाला आहे. यांच्या गटाचा डीजे हा शिवसेना पक्षप्रमुख यांना मानणाऱ्या गटाच्या पुढे घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंपरेनुसार शिवसेनेचा डीजे मिरवणुकीत १४ व्या क्रमांकावर असतो, मात्र त्याजागी शिवसेनेच्या शिंदे गटाचा डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला होता. उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणाऱ्या गटाकडून मिरवणूक थांबवण्याचा इशाराही देण्यात आला होता. अखेर पोलीस प्रशासनाकडून चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. जर नवीन मंडळांना मिरवणुकीत सहभागी व्हायचं असेल तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या क्रमांकाच्या मागे मिरवणुकीत सहभागी व्हावं, यावर ठाकरे गट ठाम होता. त्यानंतर अखेर ठाकरे गटाचा डीजे मिरवणुकीत पुढे घेण्यात आला आणि मिरवणूक सुरळीत सुरू झाली. शिंदे गटाकडून रीतसर मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पोलीस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत मिरवणूक पुन्हा सुरू केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/p1QTeoV

No comments:

Post a Comment