दुबई : कर्णधार कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ रोहित शर्मा दाखवून दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय भारताला मोलाची विकेट मिळवून देऊन गेला. रोहित शर्माने नेमकं काय केलं, पाहा...भारताला पहिल्या ओव्हर्समध्ये एकही विकेट मिळाली नाही आणि पाकिस्तानचे सलामीवीर स्थिरस्थावर होत होते. त्यावेळी रोहित शर्माने एक मोठी चाल खेळली. रोहितची ही चाल भारताला विकेट मिळवून देऊन गेली. रोहितने पहिल्या तीन षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांच्या हाती चेंडू सोपवला होता. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर रोहितने एकमोठी रीस्क घेतली. रोहितने यावेळी चेंडू आपला लाडका गोलंदाज रवी बिश्नोईच्या हातात दिला. रवीने यावेळी रोहितने ठेवलेला आपल्यावरील विश्वास सार्थ करून दाखवला. रवीने यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली. रवीने यावेळी १४ धावांवर असताना बाबरला बाद केले आणि भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. रोहितची दमदार फटकेबाजी...रोहित शर्माने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचे तोंडचे पाणी पळवले होते. रोहितने पहिल्याच षटकापासून धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहितने यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रोहितला यावेळी अर्धशतक साकारता आले नसले तरी त्याच्या या खेळीने भारतीय संघ बॅकफूटवर ढकलला गेला. रोहितने या सामन्यात १६ चेंडूंत २८ धावांची दमदार खेळी साकारली. रोहितने या सामन्यात अजून एक कमाल केली. रोहितने यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विश्वविक्रम यापूर्वी न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सूझी बेट्सच्या नावावर होता. आतापर्यंत सूझीने ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ३५३१ धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यात रोहितने ३५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी रोहितच्या नावावर ३५२० धावा होत्या. रोहितने आजच्या सामन्यात २८ धावा केल्या आणि एकूण ३५४८ धावा त्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे रोहितने अर्धशतक झळकावले नसले तरी त्याची ही खेळी मोलाची ठरली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ks7NhGx
No comments:
Post a Comment