Breaking

Saturday, September 24, 2022

दीप्ती शर्माने कमाल करत करून दिली अश्विनची आठवण, शार्लोटला केले मंकडिंग, उडाला गोंधळ https://ift.tt/Cp6GYRq

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा १६ धावांनी धुव्वा उडवला. हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. इंग्लंडपुढे विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना सावरण्याची संधी दिली नाही. इंग्लंडच्या संघाने ६७ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर भारताच्या विजयात भिंत बनून उभी राहिली. (indian all rounder reminds ashwin england batter becoming a hindrance in the victory of india) ९ व्या स्थानावर आलेली फलंदाज शार्लोट पडत्या विकेट्समध्ये इंग्लंडसाठी आघाडी घेत भारताचा विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिला काही प्रमाणात यश आल्याचेही दिसून आले. पण टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मासमोर तिची सर्व मेहनत व्यर्थ ठरली. या सामन्यात भारताच्या विजयाच्या वाटेतील अडथळ ठरू पाहत असलेल्या शार्लोटला दीप्तीने धावबाद करण्यासाठी मॉकडींगचा वापर केला. आपण अशा पद्धतीने बाद होऊ अशी शार्लोटने कधीच कल्पना केली नसणार. इंग्लंडची शेवटची विकेट म्हणून बाद झालेल्या शार्लोटला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिला डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याच स्थितीत ती तंबूत परतली. एकीकडे शार्लोटच्या चेहऱ्यावर निराशा होती. आपल्या संघाला विजय मिळवून न दिल्याचं दु:खाने तिच्या चेहऱ्यावर होतं, तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते. शार्लोट ४७ धावा करून बाद झाली. म्हणजे काय? क्रिकेटमध्ये मंकडींगच्या नियमाबाबत नेहमीच वाद होत आले आहेत. या नियमानुसार, गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी जेव्हा फलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला आपली क्रीज सोडतो, अशा स्थितीत गोलंदाज प्रसंगावधान राखत त्या फलंदाजाला स्टंपवरी बेल्स उडवून बाद करू शकतो. अशा परिस्थितीत क्रीजच्या बाहेरील खेळाडूला बाद मानले जाते. किंबहुना, हा नियम फलंदाजाला शक्य तितक्या लवकर धाव पूर्ण करण्याच्या किंवा दोन धावा घेण्याच्या प्रयत्नांना खीळ बसवतो. यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुचित फायदा घेण्यापासून रोखता येते. सन १९४८ मध्ये पहिल्यांदा मंकडिंगचा वापर करण्यात आला. त्यावेळी भारतीय महान खेळाडू वीनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक बिल ब्राऊनला अशा प्रकारे बाद केले होते. यापूर्वीही त्याने फलंदाजाला इशाराही दिली होती. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने याला मंकडिंग असे नाव दिले. आयपीएलमध्ये अश्विनने जॉस बटलरला केले होते मंकडिंग इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या जोस बटलरला मंकडिंग करून धावबाद केले होते. बटलर राजस्थान रॉयल्स संघातून खेळत होता. जेव्हा अश्विनने बटलरला मंकडिंग नियमानुसार बाद केले तेव्हा यावर बरीच चर्चा सुरू झाली. क्रिकेट तज्ज्ञांमध्ये दोन मते बनली. अश्विनने जे काही केले ते नियमानुसार होते, असे काहींचे मत होते, तर काहीजण याला खेळाच्या भावनेविरुद्ध असलेले कृत्य असे म्हणत होते. बॉलरच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी बॅट्समन क्रीज सोडू शकत नाही, असे क्रिकेटचे नियम सांगतात. मात्र, खिळाडू वृत्ती दाखवत गोलंदाज फलंदाजाला इशारा देऊ शकतो. अश्विन आणि बटलरमधील हा मंकाडिंग वाद खूप चर्चेत होता. दरम्यान, बटलर आणि अश्विन दोघेही आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wJgbpRn

No comments:

Post a Comment