पुणे : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदा २९ तास चालली. पुण्यातील विसर्जन ( ) मिरवणुकीने नवीन रेकॉर्ड केला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाचा गणेश उत्सव साजरा केला जात होता. त्यामुळे गणेश मंडळ आणि पुणेकरांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. त्यामुळे आज सायंकाळी ५ नंतर गणपतीची विसर्जन मिरवणूक संपली. या वर्षी एकूण ३७६०० मंडळ विसर्जनाच्या रांगेत होते. त्यापैकी ३००० मंडळांच्या गणपतीचे विसर्जन पहिल्याच दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला झालं. यावर्षी करोना निर्बंध मुक्त गणेश विसर्जन झाल्यामुळे जोश आणि जल्लोष पुणेकरांमध्ये दिसत होता. मानाचा पहिला कसबा गणपतीने तीन पथक लावली होती. म्हणून नेहेमी पेक्षा थोडा अधिक वेळ विसर्जनाला लागला. मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीमध्ये दीड तसाच अंतर होतं. म्हणून नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ विसर्जनाला लागला. यामध्ये काही मंडळांनी विनंती केली. जर मनाच्या गणपतीला वेळ लागत असेल तर आम्हाला आधी विसर्जन करू द्या. त्यांच्या विनंतीला मान देत आम्ही त्यांना दुसऱ्या मार्गाने वाट मोकळी करून दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावर्षीच्या गणेशोत्सवात मोबाइल चोरांचा सुळसुळाट होता. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक मोबाइल चोर आम्ही ताब्यात घेतलेत. त्यांची चौकशी करून अधिक माहिती आम्ही पत्रकार परिषद घेऊन देऊ. ८ तारखेपासून मिरवणूक संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात होता. या दहा दिवसांच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव शांततेत पार पडला, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. दरम्यान, सुरक्षेसाठी तैनात असलेले आणि कार्याध्यक्ष असणाऱ्या पोलिसांनी अलका चौकात डीजेच्या तालावर ठेका धरला होता. मिरवणुकीमध्ये पोलिसांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. अलका चौकात बेधुंदपणे पोलीस नाचत होत. हे दृश्य पाहून पुणेकरांनाचा जोश अणखी वाढला. लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी जाणारे महाराष्ट्र तरुण मंडळ हे शेवटचे गणेश मंडळ होते. साधारण १५ मिनिटे पोलिसांनी डान्स केला. त्यानंतर काही वेळाने मिरवणूक संपली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DAgRiK
No comments:
Post a Comment